मराठा आरक्षण अहवालाचे धनंजय मुंडेकडून स्वागत, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Foto

औरंगाबाद - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्यात आरक्षणासंदर्भात सकारात्मक शिफारसी असतील तर आनंदाची बाब आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अहवालाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात मराठा आरक्षण जाहीर करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.

 

राज्य मागासवर्ग आयोगाने गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांच्याकडे मराठा आरक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालात सकारात्मक शिफारसी असतील तर त्याचे स्वागत असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे. ते म्हणाले, अहवालातील शिफारसी सकारात्मक असतील तर अतिशय आनंद आहे. राज्य सरकारने हा अहवाल तातडीने मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवावा आणि सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात मराठा आरक्षण जाहीर करावे.

 

या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथील कार्यक्रमात पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मराठा समाजाने आता आंदोलन न करता १ डिसेंबरला आनंद साजरा करावा. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे येत्या १५ दिवसांत आरक्षण जाहीर करण्याचे संकेत मानले जात आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker